आरोग्य सुविधा

आरोग्य सुविधा-

  • रामानंदनगर गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या केंद्राची स्थापना 1971 ला झाली.
  • या उपकेंद्रामाफर्त हिवताप, माता बाल संगोपन, क्षयरोग नियंत्रण कुष्ठरोग निमुर्लन अंधत्व निवारण, कुटुंब नियोजन, लसीकरन यासारखे कार्यक्रम राबविले जातात.
  • प्रथमोपचाराबरोबर महिलांची डिलेव्हरी केली जाते. शालेय विद्याथ्र्यांची आरोग्य तपासणी, किशोर वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी औषधोपचार व सल्ला दिला जातो.
  • तसेच मुख्य आरोग्य केंद्राचे मदतीने बिनटाक्याचे ऑपरेशन केले जाते.
  • जन्म, मृत्यू, बालमृत्यू नोंदणी केली जाते.
  • घरोघरी भेट देवून साथीच्या रोगाचे सर्वेक्षण केले जाते पल्स पोलिओ, जंतनाशक, आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते.
  • गावात आरोग्य दिन साजरा केला जातो गावात खाजगी 13 दवाखाने आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या आजारावर उपचार केले जातात.
  • गावात 11 औषधी मेडिकल्स उपलब्ध आहेत.