सुविधा

पायाभूतसुविधा-

  • पायाभूत सुविधांमध्ये रस्ते चांगले व सोईचे असणे ही महत्वाची बाब आहे. यादृष्टीने गेल्या 10 वर्षात ग्रामपंचायतीने निरनिराळया योजनेद्वारे खडीचे सिमेंटचे तसेच डांबरी रस्ते तयार केले आहेत.
  • तसेच गावालगतच्या वस्त्यावर जाण्यासाठी खडीकरण रस्ते तयार केले आहेत. त्यामुळे दळणवळणाची चांगली सोय झाली आहे.
  • तसेच गावातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी सिमेंट कॉंक्रीटची गटारे बांधली आहेत. त्यामुळे गावत व गावाबाहेर स्वच्छता झाली आहे.
  • डास निमूर्लनासाठी पावडर फवारणी तसेच गॅगींग मशिनने औषध फवारणी केली जाते.
  • गप्पी मासे डबकी, दलदलिच्या ठिकाणी सोडले जातात.
  • गावाची दुर्गंधी नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी सार्वजनिक संडास बांधले आहेत. त्यामुळे उघडयावर संडासला बसण्याची प्रथा नष्ट केली आहे. व जो उघडयावर बसेल त्याला दंडात्मक शिक्षेचा अवलंब केला आहे.
  • नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रादेशिक नळपाणी पुरवठयामाफर्त केली आहे. तसेच विधंनविहीरीवर विजपंप कारनेही पाणीपुरवठा केला जातो.
  • संकटकाळी किंवा पाणी टंचाईच्या काळात अडचण येवू नये म्हणून ठिकठिकाणी विंधन विहीरी काढलेल्या आहेत. पावसाळयाच्या दिवसात पाणी शुध्दीकरणासाठी व निर्जन्तुकीकरणासाठी मेडिक्लोअरचा उपयोग केला जातो.