वैशिष्टपूर्ण व्यक्तिमत्व

वैशिष्टपूर्ण व्यक्तिमत्व-

  1. कै. लक्ष्मणराव किर्लोस्कर-

यांच्या पदस्पर्शाने या परिसराला समृध्दीचा मार्ग दिसला. एक लोखंडी वस्तू बनविणारा कारखाना औंध संस्थानात 1910 मध्ये 32 एकर जागेत त्यांनी सुरु केला आणि लवकरच तो किर्लोस्करवाडी या नावाने ओळखला जावू लागला सुरुवातीला 50 कामगार घेवून त्यांनी याठिकाणी चाफकर, नांगर वगैरे शेती साधनांच्या उत्पादनास सुरुवात झाली. किर्लोस्करांनी या कंपनीचे लिमिटेड कंपनीत रुपांतर केले. तेथून या उदयोग समूहाच्या विकासास खया सुरुवात झाली. सध्या येथील कामगारांची संख्या हजारपर्यंत आहे. किर्लोस्करवाडीची नियोजनबध्द स्वतंत्र वसाहत करुन कामगारांना राहणेसाठी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शाळा, दवाखाना, कॅन्टीन अशा सर्व सुविधा निर्माण केल्या आहेत.