व्यक्तिमत्वे

स्वामी रामानंद भारती-

  • त्यांचा जन्म 1 मे 1897 साली बंगळूर जवळचा एका खेडयात झाला. क्षत्रिय मराठा समाजातील हा तरुण पहिल्यापासून वेगळया विचारसरणीचा असलेने 18 व्या वर्षी घराबाहेर पडले. महाराजांच्या प्रभावी व्यक्तिमत्वाशी लोकांचा परिचय वाढू लागला पण त्यांनी शिष्य तयार करुन स्वत:चा पंथ निर्माण केला नाही. त्यांना आधुनिक शिवाजी व रामदास किंवा क्रांतीवीर आणि धर्मवीर असे संबोधू लागले.
  • ते मातृभूमीवर प्रेम, सेवाधर्म याचा प्रचार करीत होते. त्यांचे हस्ते राममंदिरातील मूर्तीची प्रतिस्थापना करणेत आली. त्यांचा रामनगरच्या विकासकामात सहभाग होता त्यामुळे लोक महाराजांचे नाव मोठया प्रेमाने घेवू लागले. त्यामुळे या गावास रामानंदनगर या नावाचा लोकांनी आग्रह धरला व त्यांचे नाव गावास देण्यात आले.