विविध योजना

विविध योजना-

  • राज्य सरकारचे केंद्रशासनाचे विविध योजना राबविण्यामध्ये गाव नेहमी सतर्क असते. गावामध्ये यशवंत ग्रामसमृध्दी योजना सलग दोन वर्षे मंजूर  झाली. त्यामधून गावातील सर्व अंतर्गत रस्ते व गल्लीतील रस्ते कॉंक्रीटीकरण केलेले आहेत.
  • तसेच शासनाचे टंचाईमधून वाडी वस्ती मध्ये विंधन विहिरीमधून लोकांना पाण्याची सोय करुन दिलेली आहे.
  • हनुमान मळा, सागरे गल्ली, नलवडे मळा, गणेश चित्रमंदिर पाठीमागील भाग, लेंगरेकर लाईन येथे वाढीव पाईपलाईन विविध योजनेतून करुन घेतलेले आहे.
  • आमदार फंडातून विंधन विहिर बोअर वर सबमर्शिबल बसवून गावात ठिकठिकाणी सार्वजनिक स्टॅंड पोस्ट काढून लोकाच्या पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे.
  • दलितवस्ती सुधार योजनेतून दलित वस्तीत, रस्ते गटारी, केलेले आहेत दलित वस्तीमध्ये विंधन विहिरीवर सबमर्शिबल बसवून ठिकठिकाणी स्टॅड पोस्ट काढून दलित वस्तीतील लोकांची पाण्याची सोय केलेली आहे.
  • विविध योजनेतून खासदार फंड, आमदार फंड अशातून गाव निर्मलग्राम करण्यासाठी 32 शौचालये बांधण्यात येवून गाव हागणदारी मुक्त केलेले आहे.