ग्रामदैवते

ग्रामदैवते-

  • गावचे मुळचे ग्रामदैवत श्रीराम होय. या मंदिराचा जिर्नोध्दार करुन तेथे पाच छोटी छोटी मंदिरे उदा. श्री.शंभु महादेव, श्री.मारुती श्री.दत्त दिगंबर, श्री.गणेश श्री.लक्ष्मी अशी छोटी मंदिरे बांधलेली आहेत.
  • प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात श्रीराम जन्मकाळ उत्सव मोठया भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो राम नवमी निमित्त मोठा उत्सव येथे भरतो. त्यानंतर श्री. हनुमान जयंती मोठया उत्साहात साजरा केला जातो.
  • अलिकडच्या 10 ते 20 वर्षाच्या कालावधीत गावात रेणूका मंदिर दुर्गामाता मंदिर, श्री गणेश मंदिर अशी मंदिरे बांधलेली आहेत. गावात दुर्गामाता मंदिरात नवरात्रो उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो शिवजयंती साजरी केली जाते. गावात वेगवेगळया धर्माची सांप्रदायाचे लोक राहतात त्यापैकी गावात मुस्लिम धर्मीय जैन धर्मिय लोक असल्याने दोन मज्जीदे आहेत दोन जैन मंदिर आहेत.
  • गावात रमजान बकरी ईद, महावीर जयंती गणेश उत्सव असे सर्व उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. प्रत्येक उत्सवामध्ये सर्व हिंदु-मुस्लिम, जैन धर्मिय लोक एकत्र येवून साजरा करतात.
  • गावातील जातीय सलोखा कायम टिकून आहे गावावर कसलेही संकट आले तरी गावातील सर्व धर्मिय लोक एकदिलाने राहतात.
  • गावात गणेश उत्सव कालावधीत विविध मंडळामाफर्त महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. मुस्लिम बांधवाचा सहभाग फार मोठा असतो अनेक गणेश मंडळामध्ये पदाधिकारी मुस्लिम बांधव वर्षानुवर्षे आहेत. गावात सामाजिक सलोखा, एकोपा टिकविण्याचे काम गावातील अनेक उतसव व यात्रा यामुळे होतो. येथे गावात सर्व धर्मिय लोक आपआपल्या उत्सवामध्ये सर्वांना सामिल करुन घेतात त्यामुळे गावत एकी बंधुभाव, सलोखा टिकून आहे.