रामानंदनगर

सन 1942 च्या स्वातंय लढयाच्या धामधुमीत या तुपेवाडीची मोठया प्रमाणात वाढ झाली. याचे मूळ कारण किर्लोस्कर कारखाना. या कारखान्यातील कामगारांची वाढ होत गेली व त्या बाहेर गावच्या कामगारांची राहण्याची सोय होवू लागली. या वर्दळीबरोबरच रेल्वे स्टेशनची सोय हे हया वस्तीच्या वाढीचे आणखी एक कारण. याचे रेल्वेस्टेशनला किर्लोस्करवाडी असे नाव देणेत आले. पुढे या गावची प्रगती होत गेली व याच काळात श्री. कृष्णा कुहाडे श्री. दगडू कुंभार, डी.एल. जाधव, चंद्रु कृष्णा मदने, शिकंदा पठाण, दत्तात्रय रकटे, बाबूराव सितारे या कार्यकत्र्यांनी 1960 च्या सुमारास बुर्ली गावापासून तुपेवाडी वेगळी करुन तुपेवाडीची ग्रामपंचायत स्थापन केली.